चातुर्मासानिमित्त संतांचे आगमन : भुसावळात शोभायात्रेने वेधले भाविकांचे लक्ष
भुसावळ : भुसावळ शहरातील ओसवाल पंचायत वाड्यातून रविवारी सकाळी 8.30 वाजता शोभायात्रा पंजाबमधील पूज्य सरिताश्रीजी महाराज यांच्या सुशिष्या व्याख्यान प्रभाविका पूज्य विभक्तीश्रीजी म.सा., जितेशाश्रीजी म.सा. पूज्य कनिकाश्रीजी म.सा. यांचा चातुर्मास शहरातील सुराणा साधना भवनात होणार आहे. यानिमित्त चातुर्मास प्रवेशानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली. यावेळी साधना सुराणा भवनात दररोज सकाळी 8.45 ते 9.45 यावेळेत प्रवचन होणार आहे. दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यत महिलांसाठी धार्मिक चर्चा होणार आहे. यावेळी संघपती सुनगचंद सुराणा, जे. बी. कोटेचा, गौतम चोरडीया, कांतीलाल चोरडिया आदी शोभायात्रेत सहभागी झाले.

