बोदवड शहरात तुर खरेदीचा शुभारंभ
बोदवड : महिनाभर उशिरा का असेना शहरात तूर खरेदी केंद्राचा बुधवारी शुभारंभ झाला. उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्याा पाटील यांच्याहस्ते उद्घाटनाने झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, संचालक युनूस बागवान, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांच्यासह व्यवस्थापक तुकाराम राने, विलास देवकर, अनिल चौधरी, हर्षल बडगुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
एक हजार 150 शेतकर्यांची नोंदणी
तुर खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक हजार 150 शेतकर्यांनी नोंदणी केली असून 997 शेतकर्यांचे फार्म ऑनलाईन झाले असून गुरुवारी दहा शेतकर्यांना तूर खरेदीसाठी बोलावण्यात आले असलेतरी केवळ एकाच शेतकर्यांनी उपस्थिती दिल्यानंतर राजु गुप्ता यांचा दहा क्विंट्टल माल मोजण्यात आला. तुरीला बाजार चार हजार 400 असलातरी शासनाने मात्र पाच हजार 800 रुपये भाव जाहीर केला आहे. बोदवड तालुका हा शेतकर्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो व यावर्षी तुरीचा पीक पेरा मोठ्या प्रमाणात आहे व तसेच बोदवड येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय दराने तूर खरेदीचा शुभारंभ झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदी दिसून आले मात्र बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काळात शेतकर्यांची तूर खरेदी न करता व्यापार्यांकडील माल खरेदी करण्यात आल्याने यावर्षी त्याची पुनरावृत्ती न होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

