भुसावळात रस्ता रोको आंदोलनाच्या इशार्‍यानंतर जोडली पाईप लाईन


भुसावळ : शहरातील महामार्गावरील हॉटेल सुहास येथील सुरू असलेले महामार्गाच्या कामामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाईप लाईन फुटल्याने परीसरातील नागरीकांना गेल्या 12 दिवसांपासून पाणी मिळत नव्हते तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता दखल घेतली जात नसल्याने तत्काळ पाईप लाईन दुरूस्तीचे काम न झाल्यास भारिप/वचित बहुजन आघाडीतर्फे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दिनेश इखारे यांनी दिला होता. या इशार्‍याची दखल घेत बुधवारी रात्री या भागात पाईप लाईन जोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !