रावेरच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी


रावेर : शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी काढली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरिष गणवानी, खजिनदार शैलेंद्र अग्रवाल, सदस्य आर.जी.पाटील, सदस्य विशाल अग्रवाल, रुची मोटरचे संचालक रामेश्वर अग्रवाल व वरुण अग्रवाल तसेच कांतीलाल महाराज व ऋषिकेश महाराज, व्यवस्थापक दिलीप वैद्य, मुख्याध्यापिका एम.आर.अकोले, बी.एम.जोशी, पर्यवेक्षक अनिल पाटील, के.जी.विभाग प्रमुख वर्षा विवरेकर, शिक्षकवृंद , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

संगीताच्या तालावर सादर केली पावली
विद्यार्थ्यांनी दिंडीी संगीताच्या तालावर व ताल मृदुंगाच्या तालावर अतिशय उत्कृष्टरित्या पावली सादर केली. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी फुगडी तसेच पावली सादर केली. काही विद्यार्थ्यांनी स्वतः अभंग गायन केले तर काही विद्यार्थ्यांनी मृदुंग वाजवले. काही विद्यार्थ्यांनी तबलावादन केला. विद्यार्थ्यांनी टाळांच्या गजरामध्ये अतिशय उत्साहामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये आनंद मिळवला. दिंडी दरम्यान हलका पाऊस सुरू होऊनही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला नाही.हभप कांतीलाल महाराज व ऋषिकेश महाराज यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक डी.पी.पाटील यांनी केले.


कॉपी करू नका.