भुसावळातून दोन दुचाकी लंपास : टोळी सक्रिय असल्याची शक्यता


भुसावळ :– शहरात 48 तासात दोन दुचाकींची चोरी झाल्याने दुचाकी चालकांमध्ये घबराट पसरली आहे. गुरुवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मातृभूमी चौकातील सार्थक भवन जवळ ललित उज्वल जैन यांनी त्यांची होंडा अ‍ॅक्टीवा (एम.एच.19 सीएन 8610) कोणी तरी चोरट्यांनी 27 फेब्रुवारी 20 ला दुपारी 12 वाजता चोरून नेली. याप्रकरणी जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार मिलिंद कंक पुढील तपास करीत आहे. दुसर्‍या घटनेत खडकारोडवर सुध्दा 26 फेब्रुवारीला होंडा युनीकॉन (एम.एच.19 डीजे 0814) ही गाडी खडकारोडवर उभी केली असता सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवली. गाडी मालक परवेज शहिमोद्दिन देशमुख (रा. बजरंग कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांनी 40 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी चोरीप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल केला. हवालदार दीपक जाधव पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !