रसलपुरात अवैधरीत्या दारू विक्री : आरोपी जाळ्यात
रावेर : रसलपूर येथून अवैध दारू विक्री करणार्यास पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून अडीच हजार रुपये किंमतीच्या 48 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईने अवैधरीत्या दारू विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आर्यन ढाब्यासमोर रसलपूर येथे पुंडलिक महाजन हे अवैधरीत दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी छापा टाकला. बॉबी संत्रा कंपनीच्या 180 एमएलच्या व दोन हजार 496 रुपये किंमतीच्या एकूण 48 बॉटल्या जप्त करण्यात आल्या. कॉन्स्टेबल संदीप धनगर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कॉन्स्टेबल राजेंद्र राठोड तपास करीत आहेत.

