रावेरात घरफोडी : पाच तासातच आरोपी जाळ्यात


रावेर : शहरातील कुंभारवाडा भागातून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे सोन्या-चांदीसह रोख रक्कम लांबवली होती मात्र रावेर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रवींद्र नारायण कुंभार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कुंभारवाडा भागातील रहिवासी प्रकाश सीताराम कुंभार यांच्या घरातून गुरुवारी पहाटे 15.5 ग्रॅम वजनाचे 34 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचा शिक्का तसेच रोख पाच हजार रुपये असे एकूण 39 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यानंतर प्रकाश कुंभार यांनी तक्रार दिल्यानंतर अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, हवालदार सतीश सानप, कॉन्स्टेबल तुषार मोरे, कॉन्स्टेबल मंदार पाटील तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !