जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने पाच कामगारांचा मृत्यू
जालना : जालना एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत वितळवलेल्या लोखंडाचा तप्त रस अंगावर पडल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारांदरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेत आखी काही कामगार गंभीर जखमी झाल्याचे समजते. गुरुवारी दुपारी 4 वाजेदरम्यान ही घटना घडली. भंगार वितळल्यानंतर तयार झालेले लोखंडाचे पाणी क्रेनद्वारे बिलेट (पट्ट्या) तयार करण्याच्या साच्यात ओतताना हा प्रकार घडला. रात्री उशिरा कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

