रावेरातील मूर्तीकाराची पित्याच्या अटकेनंतर आत्महत्या


रावेर: व्यवसायाने मूर्तीकार असलेल्या व अवघ्या दोन महिन्यांवर लग्न येवून ठेपलेल्या उपवर तरुणाने पित्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रावेेरात घडली. मनोज रवींद्र प्रजापती (20, कुंभार) असे मयत युवकाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पित्याची भेट घेत मृत्यूला कवटाळले
शहरातील कुंभारवाड्यातील प्रकाश सीताराम प्रजापती यांच्या घरातून गुरुवारी 39 हजार 800 रुपयांची चोरी झाल्यानंतर प्रजापती यांनी रावेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या घटनेनंतर तपासचक्रे गतिमान करीत पाच तासात रवींद्र नारायण कुंभार यांना चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली होती तर वडिलांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याने समाजात बदनामी होईल या भीतीने त्यांचा मुलगा मनोज प्रजापती याने रावेर रेल्वेगेटजवळ बर्‍हाणपूरकडे जाणार्‍या रेल्वेखाली आत्महत्या केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !