कार समोरा-समोर धडकल्या : 13 जण ठार
बंगळुरू : दोन कार समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. कर्नाटकच्या कुनिगलजवल हा अपघात झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. देवदर्शनाहून परतताना तुमकुरू जिल्ह्यात हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली भाविकांची कार समोरून येणार्या कारला वेगात धडकली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे.