चोरवडला तरुणाची गळफास घेत आत्महत्या
बंद घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर घटना उघडकीस
भुसावळ : तालुक्यातील चोरवड येथील बंद घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर ग्रामस्थांनी खातरजमा केल्यानंतर 30 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुजय नारायण जावळे (30) असे मयताचे नाव आहे. जावळे हे चोरवड गावात गेल्या काही वर्षांपासून एकटेच राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तालुका पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार अजय माळी यांनी यांनी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. याबाबत गणेश अशोक जावळे यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत सुजय हे शक्ती फाऊंडेशनचे विजय जावळे यांचे बंधू होत.

