भुसावळात उद्या ‘बी सारा लेडीज इक्वालिटी रन’च्या स्पर्धकांना टी शर्टचे वितरण
भुसावळ : जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी भुसावळ स्पोर्ट्स अॅधण्ड रनर्स असोसिएशन आयोजित ‘बी सारा लेडीज इक्वालिटी रन’ च्या महिला स्पर्धकांना शनिवार, 7 मार्च रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत टी-शर्ट व धावक क्रमांक संतोषी माता हॉल, मातृभूमी चौक, भुसावल या ठिकाणी मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये 850 महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला असून महिलांसाठी खास असे आकर्षक टी-शर्ट त्यांना मिळणार आहे. शिवाय काही महिला साडीवर, ड्रेस मध्ये देखील धावण्याची शक्यता गृहीत धरून तशी सूट देण्यात आली आहे परंतु प्रत्येक स्पर्धकाने धावक क्रमांक घेऊन धावणे आवश्यक आहे शिवाय निधारीत वेळेनंतर कोणासही टी-शर्ट व धावक क्रमांक मिळणार नाही, शिवाय स्पर्धेच्या दिवशी निर्धारित चार किमीचे अंतर पूर्ण केल्यानंतरच स्पर्धकांना मेडल वितरीत केले जाईल. त्याशिवाय मेडल मिळणार नाही, याची नोंद स्पर्धकांनी घ्यावी, असे समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी कळविले आहे.
जागतिक महिला दिनी स्पर्धा
स्पर्धेसाठी 8 मार्च रोजी सकाळी ठिक 05.45 च्या आत स्पर्धकांनी शहरातील ‘कोरोनेशन क्लब’ (डी.एस.हायस्कूलच्या शेजारी) दाखल होणे आवश्यक आहे त्यानंतर वॉर्म अप व झुम्बा डान्सचे आयोजन होईल. त्यानंतर ठीक सकाळी 6.30 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. धावक क्रमांक असल्याशिवाय कोणासही स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही, असे भुसावळ रनर्सचे प्रा. प्रवीण फालक यांनी कळविले आहे. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आयोजकांतर्फे प्रत्येक स्पर्धकासाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.
स्पर्धे दरम्यान शिस्त आणि स्वच्छता राखावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

