रेल्वे जी.एम.यांना विविध मागण्यांबाबत सीआरएमएस संघटनेचे निवेदन


भुसावळ : भुसावळात पीओएच वर्कशॉपच्या पाहणीसह विविध विभागाला भेटी देण्यासाठी आलेले मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांना शुक्रवारी सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मागण्यांमध्ये यावल नाका ते झेडटीसी पर्यंतच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन रेल्वे क्वार्टरचे निर्माण करण्यात यावे, पीओएच वर्कशॉपमधील दीर्घकाळापासून रीक्त असलेली पदे त्वरीत भरावीत, वाढत्या वर्कलोडसाठी कर्मचार्‍यांची अतिरीरक्त पदसंख्या वाढविण्यात यावीत, प्रतिवर्ष लोको इंजिनची ओव्हरहलिंग करण्याची संख्या वाढत असल्याने त्या प्रमाणातत वर्कशूपच्या जागेचेही विस्तारीकरण करावे, वर्कशॉपमधील पाण्याची समस्या सोडवावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रिंसिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजीनियर एस.पी.वावरे, मुख्य कार्मिक अधिकारी ए.के.सिन्हा, डीआरएम विवेककुमार गुप्ता, मुख्य कारखाना व्यवस्थापक शिव राम उपस्थित होते. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी सीआरएमएसचे मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधीया, विभागीय सचिव पी.एन.नारखेडे, मंडल सचिव एस.बी.पाटील, शाखाध्यक्ष किशोर कोलते, शाखा सचिव डी.यु.इंगले, मिडिया प्रभारी मेघराज तल्लारे, ईश्वर बाविस्कर, विकास सोनवणे, अजित अमोदकर, स्वप्निल पाटिल, सुरेंद्र गांधेले, चंद्रकांत चौधरी, राजेश सोनी, हरीचंद सरोदे, योगेश पाटील, संदेश इंगले, कुणाल बोंडे, प्रमोद बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !