टिकांकडे लक्ष न देता अभ्यासक्रमात आवश्यक घटकांचा समावेश करा


प्रा.व्ही.डी.पाटील : पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान (गणित) विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा

भुसावळ : विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रम तयार करतांना अभ्यास मंडळाला टिकांना सामोरे जावे लागते पण टिकांचा विचार न करता धावत्या जगाचा विचार करून अभ्यासक्रमात कोणते घटक आवश्यक आहेत?, कोणते अनावश्यक आहेत? ते ओळखून अनावश्यक घटकांना काढून आवश्यक घटकांचा समावेश करावा. त्यासाठी प्रथम शोध व वाचन गरजेचे असून ते आपण केले पाहिजे या सर्व बाबी विचारात घेऊन सद्यस्थितीत समस्यांना तोंड देता येईल असा आशावाद प्रा.व्ही.डी.पाटील यांनी येथे व्यक्त करीत विद्यापीठ 1990 मध्ये स्थापन झाले व ते आता तारूण्यावस्थेत आहे. तरूणाईला न्याय देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे, असेही ते म्हणाले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविदयालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाविद्यालयातील अर्थशास्त्र, व्यावसायीक अर्थशास्त्र आणि बँकींग तसेच गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्ष. वर्ष 2020-21 साठी तृतीय वर्ष कला व वाणिज्य (अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकींग) तसेच तृतीय वर्ष विज्ञान (गणित) विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा झाली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रा.पाटील बोलत होते.

यांची व्यासपीठावर होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. व्यासपीठावर प्रा.व्ही.डी.पाटील, गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.एस.आर.चौधरी, डॉ.शुभदा कुलकर्णी, डॉ.एन.एल.चव्हाण, सिनेट सदस्य प्रा.ई.जी. नेहेते, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच. बर्‍हाटे, डॉ.एन.ई.भंगाळे, डॉ.ए.डी.गोस्वामी, समन्वयक प्रा.एस.टी.धूम, प्रा.ए.पी.नवघरे व्यासपीठावर उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
प्रास्ताविक प्रा.एस.टी.धूम तर सूत्रसंचलन प्रा.व्ही.ए.सोळुंके तसेच आभार प्रा.ए.पी.नवघरे यांनी मानले. प्रसंगी डॉ.शुभदा कुलकर्णी यांनी प्रथम अभ्यासक्रमाची भूमिका मांडली तसेच डॉ.एन.एल.चव्हाण यांनी अर्थशास्त्र विषयाच्या रचनेचे सादरीकरण करून अभ्यासक्रम परीचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर डॉ.मनोज गायकवाड, डॉ.जितेंद्र तलवारे, डॉ.वाय.डी.हिवरे, डॉ.ए.यु.पाटील, डॉ.एन.एस.बोरसे, डॉ.के.के.वाघ, डॉ.विजय मांटे, डॉ.आर.एम.सरोदे, डॉ.ए.जी.सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते. कार्यशाळेसाठी जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून अर्थशास्त्राचे 75 प्राध्यापक तर गणित विषयाचे 40 प्राध्यापक सहभागी झाले. यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.उज्ज्वला महाजन, प्रा.पी.एच.इंगोले, प्रा.सचिन राजपूत, प्रा.दीपक शिरसाठ, प्रा.प्रणिता राणे, प्रा.नेहा महाजन, प्रा.स्नेहल भारंबे, प्रा.काजल वारके, प्रा.भाग्यश्री भारंबे, प्रा.माधवी द्विवेदी आदींनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !