शिक्षण विभाग विविध कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर


भुसावळ पंचायत समिती सभापती मनीषा पाटील : शहरात ‘रंगारंग’ सांस्कृतिक कार्यक्रम

भुसावळ : विद्यार्थ्यांच्या गुणात्मक, क्रीडात्मक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून कला गुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील शिक्षकांसाठी अद्यावत ग्रंथालय, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारा एकमेव भुसावळ तालुका असून यासाठी या विभागाचे अधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात व अशा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन भुसावळ पंचायत समितीचे सभापती मनीषा पाटील यांनी येथे केले. तालुक्यात जिल्हा परीषद शाळांमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. या कार्यक्रमांमधून पहिल्या तीन क्रमांकाचे कार्यक्रमांचा एकत्रीत तालुकास्तरीय जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांचे बालरंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने संतोषीमाता हॉलमध्ये गुरूवारी करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मनीषा पाटील बोलत होत्या.

ग्रामीण व शहरी ज्ञानाचा दुरावा दूर
मनीषा पाटील म्हणाल्या की, आजच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटमुळे प्रचंड प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे पण ते एकमेकांपासून दुर जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील ज्ञानाचा दुरावा कमी होत आहे आणि याच दृष्टिकोनातून शिक्षकदेखील आपले ज्ञान अद्ययावत करीत आहे. ही बाब गौरवास्पद आहे. भुसावळ तालुक्यातील जिल्हा परीषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेसह भौतिक सुविधा देखील चांगल्या झाल्या आहेत.
प्रास्ताविकात प्रभारी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान म्हणाले कीख विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनादेखील आपल्या तालुक्यातील इतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद घडवता यावा, ग्रामीण भागातील मुलांना तालुक्याला येऊन याठिकाणी इतरांसोबत माहितीची देवाण-घेवाण करता आली पाहिजे तसेच विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, गट शिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, बी.डी.बोदडे, संजय श्रीखंडे आदी उपस्थित होते.

64 शाळांचा सहभाग
या कार्यक्रमात 64 तालुक्यातील शाळांनी समूहनृत्य, एकल नृत्य, नाटिका, मूक नाटिका, सादर केली. परीक्षक म्हणून विजय चौधरी, मनोज कुलकर्णी, रमाकांत भालेराव, डी.एम.हेलोडे यांनी काम केले.
सूत्रसंचलन दीपक पाटील व निशा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, डॉ.प्रदीप साखरे, तज्ञ शिक्षक संजय गायकवाड, समाधान जाधव, विलास तायडे यांनी परीश्रम घेतले.

विजयी गट पुढील प्रमाणे
समुह नृत्य गटात प्रथम- जिल्हा परीषद शाळा तळवेल (शेतकरी नृत्य), द्वितीय- जिल्हा परीषद शाळा चोरवड (धुमरनृत्य), तृत्तीय- जिल्हा परीषद शाळा, वांजोळा (कोळीवाड्याची शान), वैयक्तीक नृत्य- प्रथम- जिल्हा परीषद शाळा मोंढाळा, द्वितीय- जिल्हा परीषद शाळा, कुर्‍हे, तृत्तीय- जिल्हा परीषद शाळा पिंपळगांव, नाटक- प्रथम- जिल्हा परीषद शाळा, कुर्‍हे, उर्दू, द्वितीय- जिल्हा परीषद शाळा, शिंदी, तृत्तीय- जिल्हा परीषद शाळा, तळवेल




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !