गटारीच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी हॉटेलमधून 40 हजारांची दारू लांबवली


पारोळा (5 ऑगस्ट 2024) : गटारी अमावास्येच्या पूर्वसंध्येला शहरातील एका हॉटेलमधून 40 हजारांची दारू, बिअरच्या बाटल्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महागडी दारू लांबवली
पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क हे शनिवार, 3 रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आले. दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवार, 5 रोजी सकाळी हॉटेल व्यवस्थापक आला असता. त्यांने हॉटेल उघडले असता बाहेरील सामान अस्ताव्यस्त केलेले त्यास आढळून आले. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या महागडी दारू, बिअर, सिगारेट असे घेऊन पोबारा केला.

दरम्यान, चोरांनी महागड्या व्हिस्की हॉटेलमध्येच संपवल्या व किचनमध्ये जेवणावर ताव मारत चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !