चाळीसगावात तडीपार आरोपी जगदीश महाजनला अटक


Jagdish Mahajan arrested in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या जगदीश जगन्नाथ महाजन (नेताजी चौक, चाळीसगाव) यास चाळीसगाव शहर पोलिसांनी हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने अटक केली. 4 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हेगारांची तपासणीचे आदेश दिल्यानंतर जगदीश महाजन हा शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चाळीसगाव शहरातील वसंत डेअरीजवळ कारवाई केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, कॉन्स्टेबल पवन पाटील, रवींद्र बच्छे, गोपाल पाटील आदींनी केली. यावेळी संशयीताने पोलिसांसोबत विनाकारण आरडा-ओरड व पोलिसांना अरेरावी करीत धक्काबुक्की व दमदाटी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील व हवालदार विनोद भोई हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !