महसूल कर थकबाकी : रीलायन्सच्या दहा टॉवरांना सील ठोकण्याचे आदेश


रावेर : महसूल कर थकविल्याप्रकरणी रीलायन्स कंपनीच्या दहा टॉवरांना सील लावण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिल्याने थकबाकीदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मार्च महिना सुरू असल्याने प्रशासकीय पातळीवर महसूल कर वसुलीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. कर वसुलीसंदर्भात येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी गांभीर्याने दखल घेत रीलायन्स कंपनीने 10 टॉवरचे पाच लाख 40 हजार थकविल्याने शुक्रवारी सायंकाळी तहसीलदारांनी टॉवरला सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत तालुकाभरात असणार्‍या इंडस कंपनी 33 टॉवरचे 18 लाख आठ हजार वसूल झाले असून 50 हजार अद्याप बाकी आहेत तसेच जिओ कंपनीकडून 27 टॉवरचे 12 लाख 50 हजार वसूल करण्यात आले असून जीटीएलच्या नऊ टॉवरचे पाच लाख 47 हजार वसूल करण्यात आलेत आहेत. आतापर्यंत 79 टॉवरकडून 36 लाख पाच हजार वसूल करण्यात आले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !