भुसावळात रेल्वे सरव्यवस्थापकांनी केले विद्युत इंजिन विभागाच्या कार्याचे कौतुक


भुसावळ : मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांनी शुक्रवारी दिवसभर वार्षिक पाहणीदरम्यान रेल्वेच्या विविध विभागांना भेटी दिल्या. विद्युत इंजीन कारखान्यात करण्यात आलेल्या आमुलाग्र बदलामुळे इंजिनात जागा निर्माण झाल्याने तत्काळ बिघाड समोर येवून आता दुरुस्ती शक्य असल्याने हा विभाग कौतुकास पात्र असल्याचे मित्तल म्हणाले. मित्तल यांनी शुक्रवारी कारखान्यातील विविध विभागांची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती
पाहणीप्रसंगी डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरीष्ठ अभियंता सुशील वावरे, उप कारखाना प्रबंधक सारीका गर्ग यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता जीएम मित्तल यांनी कारखान्याला भेट देत विविध विभागांची पाहाणी केली. त्यांना कारखाना प्रबंधक शिवराम यांनी माहिती दिली. बदल केलेल्या इंजीनात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली यावेळी कारखान्यास दोन लाखांचे त्यांनी बक्षीस जाही रकेले.

बॅटरी कार इंजिनाचे उद्घाटन
रेल्वेच्या एमओएच शेडलाही जीएम मित्तल यांनी भेट जीर्ण इंजीनात बदल घवून बॅटरी लावून हे इंजीन कार्यरत झाल्याने त्याचे उद्घाटन त्यांनी केले. तेथील कारखाना प्रबंधक हिमांशू रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता गोपाळ मधुकर चौधरी यांनी या इंजिनात बदल केला आहे. रेल्वेच्या आरओएच डेपोजवळ रेल्वे कर्मचार्‍यांना डेपोत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन पूलाचे उदघाटन जीएम संजीव मित्तल यांच्या हस्ते सायंकाळी झाले. दुपारी 3.30 वाजता रेल्वे क्षेत्रिय प्रशिक्षण केद्रास (झेडआरटीआय) भेट देत तेथील कामाची पाहणी करण्यात आली. मित्तल यांनी प्रशिक्षण केद्रास 50 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !