संतापजनक : जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार


Outrageous: Minor girl assaulted in Jalgaon जळगाव (7 ऑगस्ट 2024) : जळगावच्या एका भागातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्यात आला. या संतापजनक घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने लैंगिक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीदेखील दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लैंगिक कृत्याचा बनवला व्हिडिओ
जळगाव शहरातील एका भागात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मार्च ते जुलै 2024 दरम्यान इसंशयीत स्नेह किशोर लाठीग्रा उर्फ किशन सोनी (20, जळगाव) याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी फोनद्वारे पीडीत मुलीला बोलावून त्यांच्या फोनमध्ये लैंगिक कृत्याचे व्हिडीओ बनवून घेतला. त्यानंतर संशयित आरोपी किसन सोनी याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर मेहरुण तलावाजवळील ट्रॅकवर अत्याचार केला.

या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार पीडीत मुलीसह तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता संशयित आरोपी स्नेह किशोर लाठीग्रा उर्फ किशन सोनी याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !