पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या : जामनेर तालुक्यातील घटना


फत्तेपूर, ता.जामनेर (7 ऑगस्ट 2024) : कौटुंबिक वादातून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाण करीत तिचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील ग्रोदी येथे घडली. काजल विशाल चव्हाण असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध फत्तेपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे खून प्रकरण
जामनेर तालुक्यातील ग्रोदी येथे काजल ही पती विशाल भावलाल चव्हाणसोबत वास्तव्यास होती शिवाय सासरे भावलाल लक्ष्मण चव्हाण व सासू ईमलबाई चव्हाण कुटूंबात वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून मयत काजल व पती विशाल यांच्यात वाद सुरू होता. रविवार, 4 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास विशालने रागाच्या भरात काजलच्या नाका तोंडावर दांड्यांने मारहाण केल्याने यामध्ये तिचा मृत्यू झाला. विवाहितेचा मृतदेह तपासणीसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींना अटक
मयत काजलचे आई वडिल दोघं अपंग असून पैशांसाठी सासरची मंडळी काजलचा छळ करीत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांनी भेट दिली. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात बी.एन. एस. कलम 103 (1) 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय गणेश फड व कर्मचारी करत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !