रावेरात पंचायत समितीच्या सभेत तक्रारींचा पाऊस


रावेर : पंचायत समितीची सभा शुक्रवारी सभापती जितु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अनेक विषयांवर सदस्यांनी तक्रारी करीत आगपाखड केली. सभेची सुरुवात मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून होत असतांना मागील वेळी झालेल्या विषयांवर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती द्या? अशी मागणी सदस्या प्रतिभा बोरोले यांनी केली तर दीपक पाटील यांनी प्रभारी गट शिक्षणाधिकारी अजीत तडवी हे शिक्षकांकडून पैशांची मागणी करतात तसेच त्यांच्याबाबत तक्रारी असल्याने त्यांच्याकडील गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्याच्या मागणीसह याच सभेत याचा ठराव करण्याची मागणी केल्याने हा ठराव करण्यात आला. आदिवासी भागातील गरोदर माता, स्तनदा माता व अंगणवाडीतील मुलांना आहार नियमितपणे पुरविण्यात येत नसल्याची तक्रार करण्यात आली. वीज वितरण बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, यासह अनेक विभागांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तक्रार केली. या सभेला पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, जुम्मा तडवी, प्रतिभा बोरोले, माधुरी नेमाडे, योगीता वानखेडे, कविता कोळी, गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !