चोरटे शिरजोर : जळगावात बसमध्ये चढताना वयोवृद्धाची 35 हजारांची रोकड लांबवली.
Chorte Shirjor : While boarding a bus in Jalgaon, an elderly person was robbed of 35 thousand in cash. जळगाव (8 ऑगस्ट 2024) : वृध्द शेतकर्याच्या खिश्यातून 35 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी बसमध्ये चढताना लांबवली. ही घटना बुधवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे चोरी प्रकरण
शालिग्राम तुकाराम पाटील (65, रा.सामरोद, ता.जामनेर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 7 ऑगस्ट रोजी ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते जामनेरला जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आले.

जामनेर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील 35 हजारांची रोकड लांबवली. पैशांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विनोद भोळे हे करीत आहे.
