जळगावात दिड लाखांचा गांजा पकडला

जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी ; फेकरीसह यावलच्या संशयीतांना अटक
जळगाव : जिल्हा पेठचे पोलिस निरीक्षक ए.ए.पटेल यांना बसस्थानकात संशयीत गांजा घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंंगळवारी सकाळपासून कर्मचार्यांचा सापळा रचला. संशयीत विक्की भगवान सोनवणे (25 रा. फेकरी, ता.भुसावळ) व तन्वीर संजू तडवी (19 रा.हरीओम नगर, यावल) बसस्थानकात येताच त्यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींजवळ असलेल्या बॅगमधून सुमारे एक लाख 55 हजार रुपये किंमतीचा 30 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पेठचे पोलिस कर्मचारी नाना तायडे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, जगन सोनवणे आदींच्या पथकाने केली.




