36 हजारांची लाच भोवली : जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात


36,000 bribe : Jalgaon Mathadi and Inspector of Unprotected Labor Board in ACB’s net जळगाव : मुकादमावरील स्थगिती उठवून सुनावणीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तडजोडीअंती 36 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ निरीक्षकाला जळगाव एसीबीने विवेकानंद नगरातील कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. चंद्रकांत पाटील (57) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
जळगावातील 51 वर्षीय तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम आहेत तर तक्रारदार यांचे मित्रदेखील मुकादम होते व मात्र त्यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांकडून लावून देण्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी 5 ऑगस्ट रोजी 50 हजारांची लाच मागितली व 36 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी निरीक्षक चंद्रकांत पाटील यास गुरुवारी सायंकाळी 36 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली. जिल्हापेठ पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, नाईक किशोर महाजन तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !