निंभोरा-दसनूर रस्त्यावर साचले पावसाचे पाणी : वाहनधारक त्रस्त


सिंगनूर, ता.रावेर : निंभोरा-दसनूंर या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डा की खड्डयात रस्ता ? असा प्रश्न पडावी अशी स्थिती आहे.

निंभोरा गावात रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी गटार नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. या ठिकाणी ग्रामस्थांचा रहिवास असून येथे डासांची निर्मित्ती होऊन नागरिक आजारी पडू शकताज तसेच अद्यापही ही समस्या सोडवण्यात आली नाही. ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन तातडीने निंभोरा ते दसनूर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करावे तसेच निंभोरा गावाजवळ दोन्ही बाजूंनी गटारीचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !