दीपनगरात 800 मेगावॅटचा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी होणार प्राथमिक चाचणी

मुंबईतील बैठकीत आमदार संजय सावकारे यांच्या मागणीनंतर ऊर्जा मंत्र्यांची सूचना


A preliminary test will be conducted to set up a new project of 800 MW in Deepnagar भुसावळ (10 ऑगस्ट 2024) : दीपनगरातील विद्युत प्रकल्पामध्ये 210 मेगावॅटच्या कालबाह्य प्रकल्पामुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचा नवीन 800 मेगावॅटचा प्रकल्प त्याच जागेवर उभा करावा, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली. मुबलक जागा, पाणी व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा असल्यामुळे तसेच स्थानिक तरुणांना जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी पुरक स्थिती आहे, अशी माहिती त्यांनी उर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली.

जुन्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मिळणार संधी
दीपनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबईत बैठक लावण्यात आली होती. या बैठकीत दीपगरात जागा उपलब्ध असल्याने या जागेवर 800 मेगावॅटच्या प्रकल्प उभारणीची मागणी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ महानिर्मितीचे एमडी व संबंधित अधिकारी यांना प्राथमिक चाचणी करण्यासाठी सूचना केल्या तसेच जे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांना तात्काळ प्रशिक्षणास मान्यता मिळण्यात यावी यावर सुद्धा मान्यता देण्यात आली. जुन्या प्रकल्पाचे अंदाजे 80 ते 90 प्रकल्पग्रस्त यांना त्वरित प्रशिक्षणार्थी मागील प्रमाणे घेण्यात येतील, असे आदेश देण्यात आले. सदर बैठकीस तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, माजी सरपंच प्रभाकर सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवरही आश्वासन
प्रकल्पग्रस्त डिग्री किंवा डिप्लोमा यांच्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी होती. तशा सूचना देण्यात आल्या. जे प्रकल्पग्रस्त आता प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेत आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींना विद्युत केंद्राच्या तिन्ही कंपन्यांमध्ये कशाप्रकारे समाविष्ट करण्यात येईल, त्या प्रकारच्या नियमात बदल तात्काळ करण्यात यावे. आदी सूचना उपमुख्यमंत्री यांनी अधिकार्‍यांना दिली. पिंप्रीसेकम येथील उपोषणार्थी यांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !