धरणगाव तालुका खुनाने हादरला : डोक्यात दगड मारून तरुणाची हत्या


Dharangaon taluka rocked by murder : A young man was killed by a stone on his head धरणगाव (11 ऑगस्ट 2024) : धरणगाव तालुक्यातील सावदे प्र.चा येथे 27 वर्षीय तरुणाचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. इंदल प्रकाश वाघ (27, रा.सावदे प्र.चा, ता.धरणगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाचे कारण अस्पष्ट असून धरणगाव पोलिसांनी याप्रकरणी तपासाला वेग दिला आहे.

खुनाचे कारण अस्पष्ट
सावदे गावातील खदानीत काम करणारा इंदल हा काल रात्री 11 वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही मात्र रविवारी पहाटे सावदे गावातील जॉगिंगला जाणार्‍या काही तरुणांना सावदे बस स्थानकाजवळ त्याचा मृतदेह आढळला. याबाबत पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी ात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची माहिती घेतली. इंदल वाघच्या डोक्याच्या डाव्या बाजूला व कानावर गंभीर वार करण्यात आलेले आहेत. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी डॉ. निरंजन देशमुख यांनी सकाळी आठ वाजता तपासून मयत घोषित केले.

पोलिसांनी जाणली खूनाची माहिती
धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले, सहा.निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. खून नेमका कुणी व का केला? याबाबतची माहिती जाणून घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !