भुसावळात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात जाळ्यात
भुसावळ : हद्दपार असतानाही शहरात वास्तव्य करणार्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रायसिंग सरदारसिंग पंडित (रा.32 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.बाजारपेठ
पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. वाल्मीक नगरात संशयीतांचा शोध सुरू असताना टोळी प्रमुख रायसिंग पंडित हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करून शहरात प्रवेश करताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध भादंवि 142 प्रमाणे बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, सहा.फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी,प नाईक रवींद्र बिर्हाडे, नेव्हील बाटली, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.

