सावदा येथे हरघर तिरंगा अभियानांतर्गत तिरंग्याचे वाटप


सावदा (11 ऑगस्ट 2024) : सावदा शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे हरघर तिरंगा अभियान 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी सावदा येथे गुरुवार, 8 रोजी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याहस्ते येथील गांधी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ.केतकी पाटील यांचा वाढदिवस उत्साहात
यावेळी प्रथम डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याहस्ते केक कापण्यात आला यानंतर उपस्थित नागरिकांना तिरंगा झेंड्याचे वाटप करून 9 ते 15 ऑगस्टदरम्यान घरांवर तिरंगा लावून राष्ट्रभक्ती जोपासावी, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, ‘बेटी बचाव बेटी पढावो’च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, माजी नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे, माजी नगरसेविका रंजना भारंबे, लीना चौधरी, नंदाबाई लोखंडे, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र चौधरी, तालुका सरचिटणीस सचिन बर्‍हाटे, आयुष्यमान भारत तालुकाध्यक्ष दीपक श्रावगे, शहर उपाध्यक्ष नितीन खरे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले, शिवाजी भारंबे, भाऊ धांडे, गजानन भार्गव, राकेश पाटील, महेश बेदरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !