भुसावळातील चौधरी परिवाराचे दातृत्व : पर्यावरण संवर्धनासाठी दोन महिन्यात 255 झाडांची रोपे वाटली मोफत


भुसावळ (11 ऑगस्ट 2024) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज ओखून भुसावळातील वृक्ष प्रेमी सारंग चौधरी व महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी दोन महिन्यात पदरमोड करीत 255 मोफत रोपांचे वाटप वृक्षप्रेमींना केले. वृक्षांची लागवड करून ती जगवण्याचा संकल्पदेखील यावेळी करून घेण्यात आला.

चौधरी दाम्पत्याचा वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार
शहरात विविध भागात वृक्षप्रेमींकडून वृक्षारोपण केले जात आहे. यासाठी लागणारी रोपे अनेक जण नर्सरीतून विकत आणतात तर अनेकांना रोपे मिळत नसल्याने त्यांना जामनेर रोडवरील वृक्षप्रेमी समुपदेशक सारंग चौधरी व आरती चौधरी यांनी तयार केलेले रोपे वृक्षारोपणासाठी मोफत उपलब्ध करून दिली. जून ते जुलै या दोन महिन्यात 255 रोपांचे त्यांनी मोफत वाटप करण्यात आले. सारंग चौधरी हे नित्यानेच नवीन रोपे तयार करून वाटप करतात. त्यांनी आवळा, चिंच, आंबा, कडू लिंब यासह विविध रोपे मोफत वाटप केले. रोपे देतांना कुठलेही मुल्य त्यांनी घेतले नाही त्यामुळे त्यांच्याकडे अनेक परिचीत वृक्षप्रेमी येऊन रोपे घेऊन जातात.

फोटो दाखविण्याची अट
चौधरी मोफत रोपे वाटत असतांना रोपे नेणार्‍यांना ते खरोखरच वृक्षारोपण करीत आहे का नाही? याची खात्री करण्यासाठी वृक्षारोपण करतांनाचे फोटो काढून पाठवण्याच्या सूचना देतात. अनेक रोपे नेणारे चौधरी यांना फोटो पाठवून वृक्षारोपण केले असल्याचे दाखवितात. अनेक जण वृक्ष वाढत असल्याचे फोटोदेखील त्यांना पाठवत आहे. दाम्पत्याने वृक्ष संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच शहरवासीयांसाठी अभिमानास्पद बाब असून नागरिकांनीदेखील मोहिमेत सहभागी होवून वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चौधरी दाम्पत्याने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !