भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी राहुल वाघ तर उद्धव डमाळे शहरचे नूतन पोलीस निरीक्षक


Rahul Vagh as the new inspector of Bhusawal market police station and Uddhav as the new police inspector of Damale City भुसावळ (12 ऑगस्ट 2024)  : जळगाव पोलीस दलातील चार निरीक्षकांसह दोन सहाय्यक निरीक्षकांच्या जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवार, 10 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या तसेच विनंती, प्रशासकीय सोयीने बदल्या करण्यात आल्या आहेत.

राहुल वाघ बाजारपेठचे नूतन निरीक्षक
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी भुसावळ शहरचे निरीक्षक राहुल वाघ यांची बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे उद्धव कोंडीबा डमाळे यांची भुसावळ शहर निरीक्षकपदी तर नंदुरबार येथून बदलून आलेले निलेश गायकवाड यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. अडावदचे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांची जिल्हा विशेष शाखेत तर चोपडा शहरचे प्रमोद वाघ यांची अडावद पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.

नूतन अधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला
रविवारी बाजारपेठ ठाण्याचा निरीक्षक वाघ यांनी तर शहरचा डमाळे यांनी पदभार स्वीकारला. सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. शहरचे निरीक्षक पडघन यांना यावेळी निरोप देण्यात आला. पडघन यांच्या काळात दुचाकी चोरीसह गांजावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !