धरणगावात तालुक्यातील खुनाचा उलगडा : सख्या भावानेच केली हत्या ; कारणही धक्कादायक !


In Dharangaon, the murder in the taluk is revealed : Sakhya’s brother committed the murder धरणगाव (12 ऑगस्ट 2024) : धरणगाव तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे 25 वर्षीय इंदल प्रकाश वाघ या तरुणाचा खून झाला होता. या खुनाचा उलगडा धरणगाव पोलिसांनी करीत मयताचा मोठा भाऊ दीपक प्रकाश वाघ याला अटक केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील बस स्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने भावाचा खून केल्याचे तपासात उघड झाले.

मोबाईलचा आवाज कमी करण्याचा वाद जीवावर
एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा. येथे इंदल वाघ हा तरुण वास्तव्यास होता. इंदला हा खदानीत दगड फोडण्याचे काम करीत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो दररोज दारु पिवून कुटुंबियांसोबत वाद घालीत होता. शनिवारी रात्री इंदल याला भाऊ प्रकाश याने मोबाईलचा आवाज कमी कर, असे सांगितले. परंतू इंदलने ऐकले नाही. याचा राग आल्याने त्याने इंदलचे डोके घरातील दरवाजाच्या कडावर जोराने आपटल्याने डोक्याला जखमी केले. तसेच इंदल हा लडखडत गावाकडे निघून गेला. तेव्हा प्रकाश याने त्याचा पाठमागे केला. दरम्यान, रात्री अंदाजे 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास साक्षीदार राहुल राजू सोनवणे हा लघवी साठी घराबाहेर गेला असता त्यास प्रकाश हा हा गावाकडून घराकडे परत येतांना दिसला त्यामुळे प्रकाशनेच इंदलचं डोक्यात दगडाने व लाकडी दांडयाने मारहाण करुन त्याला जिवे ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अमळनेर पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाशखाली पाळधीचे सहा.निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, एएसआय विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार जितेंद्र पाटील, दीपक माळी, निलेश सोनवणे, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.

संतापाच्या भरात झाला खून
दारु पिवून वाद घालणार्‍या इंदलला त्याचा मोठा भाऊ दीपक याने कानशिलात लगावली. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. तो बस स्थानकाकडे जात असतांना संशयित दीपक हा देखील त्याच्या मागे गेला. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दीपक याने संतापाच्या भरात इंदल याच्या डोक्यात बैलगाडीचे शिंगाडे मारल्याने तो जमीनवर कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !