अज्ञात वाहनाच्या पाचोरा सिमेंट कंपनीतील दोघे कामगार ठार
Two workers of Pachora Cement Company were killed by an unknown vehicle पाचोरा (11 ऑगस्ट 2024) : पाचोर्यातील सिमेंट कंपनीतील दोघा कामगारांचा अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने मृत्यू झाला. अपघाताची घटना शनिवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही मयत कामगार
सुनील मोतीराम वसावे (25, रा.चानपुरा, ता.अक्कलकुवा , जि.नंदुरबार) आणि योगेश शेवता वळवी (24 वर्ष रा. कोलवान, ता.जिल्हा नर्मदा, गुजरात) अशी मयताचीं नावे असून ते पाचोरा येथील सिमेंट प्रॉडक्ट कंपनीमध्ये ते कामगार होते. शनिवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भडगाव येथून पाचोरा येथे जात असताना त्यांच्या दुचाकी (जीजे 26 ए.एफ.8924) ला अज्ञात भरधाव वाहनाने जोरात धडक दिल्याने दोघे ठार झाले.




