भुसावळ शहरात 18 ऑगस्ट रोजी गीत गायन स्पर्धा
भुसावळ (12 ऑगस्ट 2024) : कलाकारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वंशिका प्रतिष्ठान, भुसावळतर्फे स्व.किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या गीतांच्या जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेचे आयोजन रविवार, 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता भुसावळ शहरातील कृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता संपूर्ण जिल्ह्याभरातुन प्रवेश मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांना केवळ स्व.किशोर कुमार यांची गाणे गायचे आहे. प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेकरिता प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. ज्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी 9890230030, 9373536501, 9623961603, 7218844877, 9975698418 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

