भुसावळात चोरीच्या उद्देशाने फिरणारा संशयीत जाळ्यात
भुसावळ : भुसावळात कोम्बिंगदरम्यान चमेली नगर भागातील काशी विश्वेश्वर मंदिरानजीक एक संशयीत चोरीच्या उद्देशाने लपून असल्याने त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. मोहन सुनील पाटील (19, चमेली नगर, काशी विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, नाईक रमण सुरळकर, नेव्हील बाटली, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीला ताब्यात घेतले. प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिस स्टेशनला भादंवि 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
