गोजोर्‍यात जुगारावर धाड : सहा जुगारी जाळ्यात


भुसावळ  : तालुक्यातील गोजोरा येथे झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी छापा टाकत सहा जुगारींचया मुसक्या आवळल्या. रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. संशयीत आरोपी रामदास भिला कोळी, श्रावण सुका दोडे, भीमराव सीताराम पाटील, दिलीप उर्फ रामा बाळू सपकाळे, शांताराम शालिक सपकाळे, हिरा अनिल चौधरी यांना अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार युनूस मुसा शेख, राजेंद्र पवार, विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, शिवाजी खंडारे, रीयाज काझी आदींनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !