शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
भुसावळ : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा येथे नाल्याच्या काठी संशयीत आरोपी पिरू गंगा गवळी हा गावठी दारूची निर्मिती करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी छापा टाकत सहा ड्रम नवसागर मिश्रीत दारू पाडण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले तसेच 70 गावठी दारू जप्त करण्यात आली. 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार विठ्ठल फुसे, रीयाज काझी, प्रवीण पाटील, शिवाजी खंडारे, जगदीश भोई आदींनी ही कारवाई केली.
