भुसावळात धूम स्टाईल मोबाईल लांबवला


भुसावळ : धूम स्टाईल येत तिघा तरुणांनी अतिरीक्त सत्र न्यायालयात शिपाई असलेल्या तक्रारदाराचा दोन हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. 8 रोजी रात्री 10.35 वाजता रंगभवनाजवळ ही घटना घडली. सचिन अशोक पाटील (गणेश कॉलनी, प्रणव ऑफसेटजवळ, भुसावळ, मूळ रा.गुढे) हे चाळीसगाव येथून सेवाग्राम एक्स्प्रेसने 8 रोजी भुसावळला आल्यानंतर घराकडे जात असताना रंग भवनाजवळ पल्सरवरून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील तिघांनी पाटील यांना अडवत त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. पाटील यांनी सुरूवातीला मोबाईल देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ केली व पळ काढला. तपास हवालदार लक्ष्मण महाले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !