अकोट खूनातील पसार आरोपीला भुसावळात अटक
भुसावळ : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे झालेल्या खून प्रकरणातील पसार आरोपीला भुसावळातून अटक करण्यात आली आहे. गणेश उर्फ पिंट्या मुरलीधर महाजन (24, दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विकास सातदिवे व चेतन ढाकणे आदींनी आरोपीला अटक केली.



