राज्य ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जळगाव जिल्हा विजेता तर शहर उपविजेता


10 वर्षाचा शिवांश अग्रवाल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट

भुसावळ : महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-20 क्रिकेट संघटनेतर्फे मलकापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ट्वेंटी- 20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जळगाव जिल्हा संघाने जळगाव शहराला आठ गडी एक चेंडू शिल्लक ठेवत विजेतेपद पटकाविले. तृतीयस्थानी अकोला संघाला समाधानी राहावे लागले. 10 वर्षांचा शिवांश अग्रवालने अष्टपैलू कामगिरी करत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मलकापूरात झाल्या स्पर्धा
मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर 7 ते 9 मार्च 2020 रोजी नववी 15 वर्षातील राज्य अजिंक्यपद ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा झाली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जळगाव शहर संघाने निर्धारीत दहा षटकांमध्ये 75 धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरात जळगाव जिल्हा संघाने निर्धारीत लक्ष आठ गडी व एक चेंडू राखत पार केले. जळगाव जिल्हा संघाकडून प्रणव फिरके याने चौफेर फटकेबाजी करत 29 धावा काढल्या.
तृतीय स्थानासाठी अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात अकोला संघाने बुलढाणा संघाला नमवत चार धावांनी सामना जिंकला. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू कोलकत्ता येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करतील. 10 वर्षाचा जळगाव शहर संघाचा खेळाडू शिवांश अग्रवाल यांने विकेट कीपरींग करताना चार झेल व दोन यष्टीचीत करून स्पर्धेमध्ये 54 धाव्या पटकाविल्या. या लहान खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटने सन्मानीत करण्यात आले.

विजय संघाचा बक्षिसाने गौरव
विजयी संघाला राज्य ट्वेन्टी क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, बुलढाणा जिल्हा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, स्वप्नील साळुंके, अभिनव यादव, नारायण बटुले, सागर कुमार, मनोज जाधव, शरीफ रंगरेज, अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत चषक व मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतीक कुलकर्णी, राहुल कोळी, तारीख अहमद यांनी परीश्रम घेतले. पंच म्हणून नईम खान, यश निहलानी, अविनाश जगताप यांनी काम बघितले. गुणलेखक म्हणून गणेश सहानी, पराग पाश्शा यांनी कार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !