जमिनीच्या वादातून आई-वडिलांसह बहिणीचा खून
आरोपी खुनानंतर स्वतःहून हजर : घटनेने सांगली जिल्हा हादरला
सांगली : जमिनीच्या वादातून जन्म दात्यांसह बहिणीचा खून ाल्याची घटना जत तालुक्यातील उमदीत घडली. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (58) असे आरोपीचे नाव असून खुनानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला तर या घटनेत वडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (82), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (75) आणि बहिण समुद्राबाई बिरादार (62) यांचा मृत्यू झाला आहे. उमदी-जत रस्त्यावर उमदी पोलीस ठाण्यापासुन काही अंतरावर ती ही घटना घडली.
