भुसावळात महाआरोग्य शिबिराचा 445 नागरीकांना लाभ


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन : वयोवृद्धांनी शिबिराबाबत व्यक्त केले समाधान

भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराजा जयंतीचे औचित्य साधून शहरातील श्रीनगर, भोई नगर, अयोध्या नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, स्वामी विहार, भुसावळ हायस्कूल परीसरातील नागरीकांसाठी मुक्ताई कॉलनी, नगर पालिकाशाळा क्रमांक एक समोर मोफत आरोग्य तपासणी शिबि गुरुवारी आयोजित करण्यात आले. यात 445 नागरीकांनी आरोग्याची तपासणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शांताराम पाटील (गुरुजी) होते. यावेळी मंचावर अशोक बेंडाळे, झगडू ठोके, मंगला पाटील, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके व शिबिरातील सहभागी डॉक्टर उपस्थित होते.

तज्ज्ञांनी केली तपासणी
प्रास्ताविक प्रा.धीरज पाटील यांनी करतांना या जळगाव रोड विभागातील सर्व प्रभागातील एक प्रतिनिधी घेऊन आयोजन समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले व शिबिराच्या आयोजनाबद्दलची पार्श्वभूमी स्पष्ट केली. शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.पवन सरोदे, बालदंत रोग तज्ज्ञ डॉ.हर्षा कोठारी, मोतीबिंदू व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुनील मेश्राम, फिजियोथेरेपी डॉ.नमिता सरोदे, डॉ.प्रितेश कोठारी यांनी अस्थीरोग तपासणी सोबत बी.एम.डी.मशीनद्वारे हाडातील कॅल्शियम मोफत तपासले. डॉ.ज्योती गुरव, डॉ.भावना प्रजापती, डॉ.वर्षा वाडीले यांनी महालॅब अंतर्गत सीबीसी, कोलेस्टेरॉल, एचआयव्ही, संधीवाताच्या रक्त चाचण्या मोफत केल्या गेल्या. श्री रीदम रुग्णालयातर्फे डॉ. ृप्ती तोरकडे, डॉ.शेखर पिवाल यांनी सहभागी नागरीकांची रक्तदाब तपासणी केली. नागरीकांसह नगर परिषदेच्या शाळा क्र. 1 च्या विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी यावेळी करून घेण्यात आली. शिबिरास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच समाजातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी प्रा.धीरज गणेश पाटील, विशाल प्रल्हाद ठोके, शंतनू गणेश पाथरवट, उदय बोंडे, ललित नेहेते, लव झाडगे, अमोल पाटील, डॉ.तुषार नारखेडे, किशोर चौधरी, भूषण ठोके, कुशल पाटील, प्रा.सीमा पाटील, कविता ठोके, नयना बोंडे, सुरेखा कुरकुरे, सुरज चौधरी, श्याम खैरनार, विकास झांबरे, मनोज तडवी यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, ज्या रुग्णांची विशेष तपासणी करणे आवश्यक होते अशा काही रुग्णांना शिबिर स्थळावरुन थेेट रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले.

शिबिरामुळे नागरीकांनी व्यक्त केले समाधान
सीबीसी, कोलेस्टेरॉल, संधीवत रक्त चाचण्या ह्या महागड्या आहेत, हजारो रुपयांचा खर्च होतो, शिबिराच्या माध्यमातून घराजवळच सुविधा मिळाली हे अतिउत्तम झाल्याचे धनसिंह बोरणारे म्हणाले तर डोळ्यांच्या समस्या फार प्रमाणात वाढल्या असून शिबिरातून मोतीबिंदू आहे असे समजले, त्वरीत उपचार करण्यास सुरुवात करणार असल्याचे वंदना भोई म्हणाले. शहरातील रस्ते खराब असल्याने हाडांच्या समस्या वाढल्या आहेत, शिबिरातील उपलब्ध मशीनद्वारे हाडातील कॅल्शियम मशिनद्वारे लगेच समजल्याचे रमेश खैरनार म्हणाले तर महिलांच्या आरोग्याच्या समस्या आजकाल वाढू लागल्या आहेत, शिबिरातून निदान झाल्याने आनंद वाटत असल्याचे आरती चौधरी म्हणाल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !