रावेर मतदारसंघात रस्त्यांच्या 27 कोटींच्या कामांना मंजुरी


रावेर/फैजपूर- रावेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या 17 रस्त्यांना सन 2020-21 मध्ये आर्थिक अधिवेशनात 27 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यात यावल-रावेर राज्यमार्ग फैजपूर व यावल शहरातील रस्ते सुधारणा करण्यासाठी 300 लक्ष, भालोद ते बामणोद रस्ता 150 लक्ष, परसाळे ते डोंगरकठोरा रस्ता 100 लक्ष, पिळोदा ते (यावल भुसावळ) रस्ता 100 लक्ष, खिरोदा-फैजपूर-रोझोदा-चिनावल-उटखेडा प्रजिमा 72 लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण 220 लक्ष, खिरोदा फैजपूर प्रजिमा 72 चिनावल ते विवरा मजबुतीकरण व डांबरीकरण 180 लक्ष, रा.मा. 45 कोचूर-चिनावल-उटखेडा-मुंजलवाडी-रसलपूर-केर्‍हाळे-भोकरी-तामसवाडी-खिरवड-नेहेते-दोधे-अटवाडे-खानापूर-निरूळ-पाडळे ते राज्यहद्द रस्ता प्रजिमा 70 किमी 41/275 ते 46/300 चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (भाग खानापूर ते अटवाडा) 150 लक्ष, खिरोदा फैजपूर-रोझोदा-चिनावल-विवरा-कुसुंबा ते प्रजिमा-1 रास्ता प्रजिमा – 72 किमी 13/00 ते 19/00 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग चिनावल ते विवरा) रा.मा. 45 कोचुर-चिनावल-उटखेडा-मुंजलवाडी-रसलपूर-केर्‍हाळे-भोकरी-तामसवाडी-खिरवड-नेहेते-दोधे-अटवाडे-खानापूर-निरूळ-पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजिमा – 70 किमी 41/275 ते 46/300 चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता रावेर (भाग निरूळ ते पाडळे), खिरोदा-फैजपूर-रोझोदा-चिनावल-विवरा-कुसुंबा ते प्रजिमा -1 रास्ता प्रजिमा-72 किमी 4/900 ते 8/00 व 9/500 ते 11/00 मध्ये लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता.रावेर (भाग फैजपूर ते रोझोदा-चिनावल) राज्यमार्ग करणे 1 ते उमर्ती-वैजापूर-लंगडाआंबा-मांजालपाल-कुसुंबा-रावेर मार्ग प्रजिमा-1 किमी 99/00 ते 104/00 व किमी 112/00 ते 115/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता.रावेर (भाग मंजुलवाडी ते कुसुंबा) रामा-45 कोचुर-चिनाव-उटखेडा-मुजलवाडी-रसलपूर-केर्‍हाळे-भोकरी-तामसवाडी-खिरवड-नेहेते-दोधे-अटवाडे-खानापूर-निरूळ-पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजीमा -70 किमी 15/500 ते 23/600 चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग मुंजलवाडी ते केर्‍हाळे) राज्यमार्ग करणे 1 ते उमर्ती-वैजापूर-लंगडाआंबा-मांजालपाल-कुसुंबा रावेर मार्ग प्रजिमा-1 किमी 83/200 ते 95/500 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.रावेर (भाग खिरोदा-चिनावल-वडगाव-निंभोरा-बलवाडी-तांदलवाडी-हतनूर) रास्ता रामा 46 किमी 6/800 मध्ये सुकी नदीवर वडगाव गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इत्यादी कामांना सुमारे 27 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे व ज्ञानेश्वर महाजन यांनी कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !