भुसावळात महिलांनी पाण्याची नासाडी टाळत दिला पर्यावरणाचा संदेश


सखी श्रावणीचा स्तुत्य उपक्रम : धूळवडऐवजी झाडांना दिले पाणी

भुसावळ : शहरातील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी आगळया-वेगळ्या पद्धतीने पाण्याची नासाडी टाळत ‘पर्यावरण वाचवा’ चा संदेश देत होळी साजरी केली. स्थानिक चक्रधर नगर भागात मंगळवार, 10 रोजी दुपारी चार वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.वंदना वाघचौरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उज्वला बागुल, पुष्पा चौधरी, उज्वला चौधरी, योग शिक्षिका मंदाकिनी केदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पाण्याची नासाडी न करता लावलेली झाडे जगवा असा संदेश महिलांनी दिला. याकरीता स्थानिक टीव्ही टॉवर मैदानावरील लावलेल्या झाडांना जगविण्यासाठी झाडांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. यासह धुलीवंदनाचे औचित्य साधुन महिलांनी आपापसातील हेवे-दावे, मतभेद बाजूला सारुन संगीत खुर्ची, लकी ड्रा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला. यावेळी डॉ.वंदना वाघचौरे, उज्ज्वला बागुल, समाज कल्याण विभागाच्या शोभा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती संस्थाध्यक्षा राजश्री नेवे यांनी दिली. सूत्रसंचलन जयश्री वाणी यांनी तर आभार सुनीता चौधरी यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
संगीत खुर्चीत उषा राणे तर लकी ड्रा मध्ये धनश्री राणे, राजश्री बादशहा, जयश्री वाणी यांनी बक्षिसे पटकाविली. मान्यवरांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आले .
यशस्वीतेसाठी माया चौधरी यांच्यासह स्मिता माहूरकर, वैशाली सरोदे, कल्पना बोंडे, सुनंदा पाटील, अश्विनी जैस्वाल, वंदना झांबरे,
लिना इंगळे, वसुंधरा महाजन, अर्चना इंगळे, भाग्यश्री नेवे,
तर विशेष सहकार्य उमेश नेवे, पर्यावरण प्रेमी चंद्रशेखर जंगले, गोसेवक रोहित महाले, प्रणव डोलारे, राजेश ठाकुर, मयुर सावकारे, श्याम शर्मा यांनी झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था करून देत सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !