शिंदखेडा वनक्षेत्रपाल धुळे एसीबीच्या जाळ्यात
शिस्तभंगाची कारवाई न करण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारली
धुळे : शिस्तभंगाची कारवाई न करण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करून 25 हजारांचा पहिला हप्ता स्वीकारणार्या शिंदखेडा वनक्षेत्रपाल किरण यादवराव माने (36, रा.45 अमोल नगर, नकाने रोड, देवपूर, धुळे) यास धुळे एसीबीच्या पथकाने लाच घेताना बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केल्याने लाचखोर अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लाच भोवली, वनक्षेत्रपाल जाळ्यात
वनविभागातील एका पदावर कार्यरत असलेल्या 46 वर्षीय तक्रारदाराने बोगस प्रमाणके सादर केल्याने आरोपी वनक्षेत्रपाल किरण माने यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली होती तर या नोटीसीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही न करण्यासाठी तक्रारदाराकडे बुधवारी दोन लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी सायंकाळी लाचेतील पहिल्या हप्त्यापोटी 25 हजारांची लाच स्वीकारताना आरोपीस अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर आदींच्या पथकानपे केली.

