विना परवानगी लाकडांची वाहतूक : चोरवड नाक्याजवळ दोन ट्रक जप्त
रावेर : पेरू व लिबांचे विना परवानगी लाकडे घेऊन मध्य प्रदेशकडे जाणार्या दोन ट्रकांना यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई चोरवड नाक्यानजीक करण्यात आली असून दोन्ही ट्रक रावेर वनक्षेत्रात जप्त करण्यात आल्या. पेरूच्या लाकडांनी भरलेले ट्रक (क्र एम.एच.19 झेड 0557) तर लिंबाच्या लाकडांनी भरलेला ट्रक (क्र एम.पी.07 जी.5970) हे मध्य प्रदेशकडे जात असल्याची गोपनीय माहिती फिरत्या गस्त पथकाचे यावल वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनरक्षक रवी पवार, वनपाल पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचुन दोन्ही ट्रक महाराष्ट्र सीमा ओलांडून मध्यप्रदेश सीमेत शिरण्याआधी पकडले. दोन्ही ट्रका मधील लाकडांचा पंचनामा करण्यात आला. अधिक तपास वनपाल अतुल तायडे करीत आहेत.

