जिजाबराव वाघ यांना राज्यस्तरीय समता शिक्षक गौरव पुरस्कार


चाळीसगाव : व्ही.एच.पटेल प्राथ. विद्यालयाचे ज्येष्ठ उपशिक्षक जिजाबराव वाघ यांना यंदाचा राज्यस्तरीय समता शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. समता शिक्षक संघातर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. पुरस्कारांची घोषणा राज्य अध्यक्ष अरुणराव जाधव व महासचि किशोर पाटील कुंझरकर यांनी नुकतीच पत्रपरिषदेत केली. पुरस्कारांचे वितरण लवकरच होणा-या अधिवेशनात केले जाणार आहे. जिजाबराव वाघ हे गेल्या अडीच दशकांपासून शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना आजवर शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल 21 तर साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल एकुण 30 पुरस्कार मिळाले आहे. संस्थाध्यक्ष नारायणदास अग्रवाल, शालेय समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, मुख्याध्यापक भाऊसाहेब जगताप यांनी त्यांचा सत्कार केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !