सातोद-कोरपावली रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त


यावल (6 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील सातोद-कोरपावली रस्त्यावर गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अवैध गौणखनिजाची वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने पकडले आहे. दोघा ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. दोघा ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजवण्यात आली.

अवैध गौण खनिज वाहतूक ऐरणीवर
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे गस्ती पथक प्रमुख मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी भारत वानखेडे, शरीफ तडवी, संदीप गोसावी व गजानन पाटील या पथकासह गस्तीवर असताना गुरुवारी सकाळी त्यांना सातोद ते कोरपावली रस्त्यावर हळकाई नदीच्या पात्रात दोन ट्रॅक्टर टॉलीत वाळू वाहतूक करताना आढळले. मनोहर सुधाकर पाटील (धानोरा, ता.चोपडा) यांच्या मालकीचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19सी.झेड 1253) व रवींद्र गजानन कोळी (रा.यावल) यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.34 बी.एफ.1260) मध्ये प्रत्येकी एक ब्रास वाळू अवैधरित्या आढळली. घटनास्थळावर पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर पतलाठी मिलींद कुरकूरे, राजु गोरटे, विजय अढाळे, सागर तायडे, सोनुसिंग पाटील यांनी तहसील कार्यालयात लावले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !