भुसावळ शहरातील गणेश मंडळासाठी विविध पारितोषिके मिळणार !
मानवतकर बहुउद्देशीय संस्था, पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहरचा उपक्रम
भुसावळ (9 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरातील सांस्कृतिक वारसा सातत्याने चालावा लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव साजरा होण्यासाठी व अधिकाधिक आपल्या परंपरेचा वापर व्हावा विविध सामाजिक उपक्रम राबवावे यासाठी गणेश मंडळांनी केलेल्या भव्य सजावट, आकर्षक मूर्ती, सामाजिक संदेश देणारा देखावा, जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन, गणराया मिरवणुकीत भारतीय परंपराची जपवणूक, वाद्यांचा वापर, शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक उपक्रम अश्या विविध विषयावर विविध पारितोषिके देण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळाचे याबाबत मान्यवराकडून परीक्षण करण्यात येणार आहे.
शहरातील मानवतकर बहुउद्देशीय संस्था, भुसावळ पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहर भुसावळ शहराच्या वतीने ही बक्षिसे देण्यात येतील. याबाबत अधिक माहितीसाठी 9175459115 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

